कधी कधी असंच एकांतात बसलं तर ...
'मन अचानक मागच्या आठवणीत हरवु लागतं,
वर्तमानातल्या विचारांची तंद्री तूटते,
आणि ते भूतकाळातच रमू लागते'.
नुसते शाला म्हंटले तरी किती आणि काय काय आठवते. आणि एक मस्त हसु चेहऱ्यावर सोडून जाते.
वर्तमानतील लोक आणि अनुभव, शाळेतील मित्र आणि निस्वार्थी मैत्री. किती फरक आहे.
सकाळ - सकाळ आंघोळ, चहा-पाणी, नाश्ता आटपून भर-भर पावलं शाळेच्या दिशेने चालायला लागायची.
साइकिल वर जायचो आम्ही. दर वर्षी बेंच पकडायला लवकर जायचे. आता गेलो होतो तर नीट बसता पण येत नव्हते. पण आधी ३ जने बसायचो.
शाळेत पोहोचताच राष्ट्रगीताचा पहिला-वहिला मान, ते स्तब्ध उभे राहण्याचे तत्व सर्वांना पाळायलाच लागते, मग 'या कुंदे तुषार हार, धवला ...' अशी सरस्वतीची प्रार्थना करून सुरु व्हायचा शाळेचा हर एक नविन दिवस.
त्या विश्वाचा ... त्या आयुष्याचा आज हेवा वाटतो ... खऱ्या अर्थाने हेवा वाटतो ...



